व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

आली रे आली राज्यात तलाठी भरती आली तब्बल 1,700 जागासाठी आताच करा अर्ज! Talathi Bharti 2025

No comments

आली रे आली राज्यात तलाठी भरती आली तब्बल 1,700 जागासाठी आताच करा अर्ज! Talathi Bharti 2025
आली रे आली राज्यात तलाठी भरती आली तब्बल 1,700 जागासाठी आताच करा अर्ज! Talathi Bharti 2025

Talathi Bharti 2025 सध्या राज्यात तलाठ्यांच्या तब्बल 2471 पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक गावांचा कारभार एका तलाठ्याच्या ताब्यात दिला गेलेला आहे. परिणामी, ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या कामांना विलंब लागत आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन लवकरच 1700 नव्या तलाठी पदांची भरती करण्याच्या तयारीत आहे. ही भरती गेल्या काही वर्षांपासून रखडलेली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये भरती लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

तलाठी भरती तब्बल 1,700 जागा

राज्याचा महसूल विभाग हा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा विभाग असून, या विभागात सुमारे 3000 पदे रिक्त आहेत. यामध्ये 2471 जागा केवळ तलाठ्यांच्या आहेत. त्यामुळे एका तलाठ्यावर 3 ते 4 गावांचा ताण आलेला असून, कामे वेळेत होत नाहीत. तलाठ्यांची कमतरता असल्याने शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या सातबारा उतारे, शेतसारा वसुली, गारपीट पंचनामे, निवडणुकीसंदर्भातील कामे आदी प्रक्रिया रखडल्या आहेत.

तलाठी हे गावपातळीवरचे एक महत्त्वाचे पद मानले जाते. परंतु सध्या या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे प्रशासन सुरळीत चालण्यासाठी आणि नागरिकांना सेवा वेळेत मिळण्यासाठी 2025 मधील ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणे आवश्यक आहे. शासनाने यासाठी हालचाली सुरू केल्या असून भरती प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आहे.

तलाठी भरती 2025 महत्त्वाची माहिती एकत्रितपणे

घटकमाहिती
पदाचे नावतलाठी (गट – क)
एकूण पदसंख्या4644 (यामध्ये नवीन 1700 पदांचा समावेश)
शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
परीक्षा पद्धतऑनलाईन CBT परीक्षा (200 गुण)
विषयमराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित
वयोमर्यादाखुला वर्ग: 18 ते 38 वर्षे, राखीव वर्ग: 43 वर्षे
फीखुला वर्ग: ₹1000, राखीव वर्ग: ₹900
अर्ज पद्धतऑनलाईन (https://mahabhumi.gov.in वर लवकरच सुरू)

तलाठी पदांची रिक्त जागा

  • एकूण रिक्त पदे: 2471
  • रिक्त महसूल सहायक पदे: 141
  • एका उमेदवाराला केवळ एका जिल्ह्याचा अर्ज करण्याची मुभा असणार आहे.

शैक्षणिक अर्हता

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी आवश्यक
  • संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी किंवा हिंदी विषय असणे गरजेचे
  • मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य

परीक्षा TCS कंपनीमार्फत घेतली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल.
एक उमेदवार फक्त एका जिल्ह्याचा अर्ज करू शकेल.

प्रवर्गनिहाय पदवाटप

  • सर्वसाधारण: 1676
  • महिला: 1473
  • माजी सैनिक: 705
  • खेळाडू: 216
  • प्रकल्पग्रस्त: 213
  • भूकंपग्रस्त: 63
  • अंशकालीन पविधार: 447

सध्या तलाठ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे गावागावांतील कामांमध्ये अडथळे येत आहेत. शेतकरी वर्गाचे अनेक कामे वेळेवर होत नसल्याने सातबारा उतारा, पंचनामे, रेती चोरी प्रतिबंध, जमिनीच्या नोंदी या सर्व प्रक्रियांवर परिणाम होत आहे. प्रशासनाची कामगिरी सुरळीत राहण्यासाठी आणि शेतकरी, ग्रामस्थ यांना दिलासा मिळावा म्हणून ही भरती अत्यावश्यक ठरत आहे.

राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://mahabhumi.gov.in या वेबसाइटवर वेळोवेळी भेट देत माहिती तपासावी.

Disclaimer: वरील माहिती ही विविध सरकारी संकेतस्थळे व वृत्तसंस्थांच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत संकेतस्थळावरून अधिकृत अधिसूचना तपासावी. भरती प्रक्रियेतील कोणताही बदल किंवा विलंब यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

(FAQs) Talathi Bharti 2025

1. तलाठी भरती 2025 अर्ज कधी सुरू होणार?
अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, परंतु लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

2. अर्ज कुठे करायचा आहे?
https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

3. परीक्षा कोण घेत आहे?
परीक्षा TCS कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे.

4. कोणती पात्रता लागते?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.

5. एका उमेदवाराला किती जिल्ह्यांसाठी अर्ज करता येतो?
फक्त एका जिल्ह्यासाठीच अर्ज करता येतो.

Leave a Comment

सरकारी योजना ग्रुप जॉईन 👉