व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

रेशनकार्ड घरबसल्या मोबाईल वर काढा पहा पूर्ण माहिती! Ration Card Apply

No comments

Ration card apply रेशनकार्ड घरबसल्या मोबाईल वर करा पहा पूर्ण माहिती
Ration card apply रेशनकार्ड घरबसल्या मोबाईल वर करा पहा पूर्ण माहिती

Ration card apply आज आपण पाहणार की रेशन कार्ड घरबसल्या मोबाईलवर कसे काढावे यासाठी काय करावे लागेल अर्ज कसा करायचा ऑनलाइन करायचं की ऑफलाईन करायचा कागदपत्र कोणी दिला त्याचप्रमाणे आपल्याला कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल याविषयी माहिती बघणार आहोत

Ration card apply संपूर्ण माहिती

आजच्या युगामध्ये तुम्हाला माहिती रेशन कार्ड हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे आणि हा महत्त्वाचा पुरावा आपल्याला भरपूर ठिकाणी वापरता येतो रेशन कार्ड वर आपल्याला मोफत आणण्याचा योजना अंतर्गत गहू आणि तांदूळ मोफत मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला परिस्थिती कमी रेशन कार्ड हा पुरावा लागतो रेशन कार्ड गोरगरिबांचा आधार आहे परंतु तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड कसे मोबाईलवर कसे काढता येईल याविषयी आपण थोडक्यात माहिती बघुयात

Ration card apply तुम्हाला हा प्रश्न अनेकदा पडला असेन की, रेशन कार्डसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा? सरकारी कार्यालयात रांगेत उभे राहावे लागेन का? आता या सर्व प्रश्नांची चिंता करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला घरी बसून रेशन कार्ड मिळवण्यासाठी अत्यंत सोपा मार्ग सांगणार आहोत. या बातमीच्या माध्यमातून UMANG App आणि ‘आपले सरकार’ या दोन्ही पद्धतींची सविस्तर माहिती घेणार आहोत.

रेशन कार्ड म्हणजे काय?
रेशन कार्ड हे भारत सरकारने जारी केलेले एक महत्त्वाचे सरकारी दस्तऐवज आहेत. यामध्ये तुमचे नाव, पत्ता आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती यामध्ये भरलेली. रेशन कार्डमुळे तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येत असतो, त्यामुळे तुमच्याकडे ते असणे अत्यंत गरजेचे आहेत. जर तुमच्याकडे अजूनही रेशन कार्ड नसल्यास, काळजी करू नका. आता तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून यासाठी अर्ज करू शकतात.

UMANG App द्वारे रेशन कार्डसाठी अर्ज कसा करावा?
UMANG App हे सरकारी सेवांसाठी एक युनिफाईड मोबाइल ॲप्लिकेशन उपलब्ध करण्यात आलेले आहे. या ॲपचा वापर करून तुम्ही अनेक सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकतात, त्यात रेशन कार्डसाठी अर्ज करणे देखील समाविष्ट आहे.


तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये UMANG App डाउनलोड करायचे आहे.
ॲप ओपन करून तुमच्या मोबाईल नंबरसह नोंदणी करावी.
ॲपच्या होमपेजवर आल्यानंतर, खाली डावीकडे असलेल्या ‘सर्विसेस’ सेक्शनवर क्लिक करून घ्यायचे.
‘युटिलिटी सर्विसेस’ मध्ये स्क्रोल करून ‘Apply Ration Card’ या पर्यायावर क्लिक करायचे.
तुमचे राज्य निवडा आणि मागितलेले तपशील भरायचा.
तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख अशी वैयक्तिक माहिती भरावीत.सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.
शेवटी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करायचे.

रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी रेशन कार्डसाठी अर्ज करण्याची अत्यंत सोपी आणि अधिकृत पद्धत म्हणजे ‘आपले सरकार’ पोर्टल होय याच्या माध्यमातून तुम्ही सहजरीत्या अर्ज करू शकता.

स्टेप १:अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://aaplesarkar.mahaonline.gov.in प्रथम या वेबसाइटवर जायचे आहे .

स्टेप २:नोंदणी किंवा लॉग इन करा
जर तुम्ही नवीन युजर असल्यावर, तर मोबाईल नंबर आणि आधार पडताळणी करून नवीन खाते तयार करावे त.
जुने युजर असाल, तर थेट लॉग इन करून घ्यायचे.

स्टेप ३:रेशन कार्ड सेवा निवडा
यचे
‘अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग’ निवडायचा
‘नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करा’ या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे.

स्टेप ४:अर्जाचा फॉर्म भरा

येथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे, आधार क्रमांक, पत्ता आणि रेशन कार्डचा प्रकार (उदा. PHH, NPHH, AAY) भरावा लागतो.

स्टेप ५:आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे?
वर नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करावी.

स्टेप ६:अर्ज सबमिट करा

सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करावा. तुम्हाला एक पावती आणि अर्ज संदर्भ क्रमांक (Application Reference Number) मिळत असतो.

अर्जाची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला राशन कार्ड मिळण्यासाठी साधारणपणे १५ ते ३० दिवसांचा कालावधी लागतो.
रेशन कार्ड ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात किंवा जिल्हा अन्न पुरवठा कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतात. तिथे आवश्यक कागदपत्रे घेऊन जावेत, अर्ज भरावा आणि तो संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावीत.

तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची?
https://rcms.mahafood.gov.in या वेबसाइटवर भेट द्यावी लागते
‘रेशन कार्ड अर्ज स्थिती’ वर क्लिक करावेत.
तुमचा संदर्भ क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासू शकतात.

तुमच्याकडे रेशन कार्ड नसले तरी आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. या सोप्या पद्धती वापरून तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकतात. आणि सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अशाप्रकारे आपण पाहिलं की घरबसल्या मोबाईलवर आपल्याला रेशन कार्ड कसे करता येईल विषय माहिती बघितली आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम  व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

सरकारी योजना ग्रुप जॉईन 👉