व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉
येथे क्लिक करा

शाळा कॉलेज गणपतीच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल! School Colleges Holiday

No comments

School colleges holiday शाळा कॉलेज गणपतीच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल
School colleges holiday शाळा कॉलेज गणपतीच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल

School colleges holiday आज आपण पाहणार की राज्यातील शाळा कॉलेज गणपतीच्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात काय बदल झालेला आहे याविषयी माहिती पाहणार आहोत ही माहिती अतिशय उपयुक्त आहे कारण विद्यार्थी पालक शिक्षक यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण त्यांचे नियोजन हे सर्व त्याच्यावरच अवलंबून असतं तर बघुयात याविषयी माहिती

School Colleges Holiday संपूर्ण माहिती

राज्यातील नागरिकांसाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे शाळा कॉलेज सुट्ट्यांच्या वेळापत्रकात काही बदल झालेला आहे गणपती असेल दहीहंडी उत्सव असेल आता या महिन्यात तुम्हाला माहिती भरपूर काही सण असतात आणि राज्य शासनाने वेळापत्रकात काही बदल केलेला आहे शालेय शिक्षण विभागाने जे वेळापत्रक जारी केले होते त्यामध्ये सुट्ट्या या वर्षभराच्या परंतु आता त्यामध्ये काही बदल केलेला आहे यांच्या गणपतीत आपल्याला किती दिवस सुट्टी असतील याविषयी आपण माहिती बघूया

School colleges holiday शाळांना अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन व दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारने ७ ऑगस्टला बदलून गौरी-गणपती व नारळीपौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे.

मुंबईत गणपती विसर्जन आणि दहीहंडी या सार्वजनिक सणांच्या दिवशी शहरातील बहुतांश रस्त्यांवर प्रचंड गर्दी व वाहतूककोंडी होते. गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरतात. त्यावेळी वाहनांचे मार्ग बदलले जातात, तसेच विसर्जन मिरवणुकांमुळे रस्त्यांवर वाहतूक ठप्प होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना अपघाताचा धोका संभवतो. या दिवशी सुट्टी न दिल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची राहील, असे  शिक्षिका रेखा बोंडे यांनी सांगितले.

पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनीही, गणपती विसर्जन व दहीहंडी हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. त्या दिवशी शाळा सुरू ठेवल्यास एखादा विद्यार्थी गर्दीत हरवला, तर जबाबदारी शासन घेणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

माझी मुलगी चौथीत शिकते. पारंपरिक सणांच्या दिवशी
मुलांना विशेष उत्साह असतो. प्रचंड गर्दीत मुले शाळेला कशी जाणार? सरकारने सुट्टी बदलून चूक केली आहे – अन्नपूर्णा कलशेट्टी, पालक

पूर्वापार चालत आलेल्या या सुट्ट्या का रद्द केल्या, याचे स्पष्ट कारण मिळालेले नाही. शासनाने घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही – सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, 
शिक्षक भारती

अशाप्रकारे आपण पाहिलं की राज्यातील शाळा कॉलेज गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये काही बदल झालेला आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी 9322515123या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा

Leave a Comment

सरकारी योजना ग्रुप जॉईन 👉